maharashtra

जातीवाचक शिवीगाळ करणार्‍या दोघांविरोधात गुन्हा


जातीवाचक शिवीगाळ करून एकाला दमदाटी करणार्‍या दोघांविरोधात वाई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राहुल प्रकाश मोरे वय 25, राहणार बलकवडी, तालुका वाई यांनी फिर्याद दिली आहे.

सातारा : जातीवाचक शिवीगाळ करून एकाला दमदाटी करणार्‍या दोघांविरोधात वाई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राहुल प्रकाश मोरे वय 25, राहणार बलकवडी, तालुका वाई यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मौजे बलकवडी गावाच्या कमानी जवळ विक्रांत आनंदा जाधव व महेंद्र धोंडीबा जाधव दोघे राहणार बलकवडी यांनी मोरे यांना बोलावून गावातील लहान मुलांना दमदाटी का करतोस, तुला फार मस्ती आली आहे काय, अशी दमदाटीची भाषा वापरत त्याला जातीवाचक शिवीगाळ केली. मी पोलीस पाटील आहे. माझे कोणीच काही वाकडे करू शकत नाही, असे म्हणत मोरे यांना मारहाण व शिवीगाळ केली. अधिक तपास तपास वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल जानवे करीत आहेत.