विकसकाच्या बांधकाम साइटवरून सेंट्रिंग चे 30 हजार रुपये किमतीचे साहित्य रिक्षातून जबरदस्तीने घेऊन जाणार्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : विकसकाच्या बांधकाम साइटवरून सेंट्रिंग चे 30 हजार रुपये किमतीचे साहित्य रिक्षातून जबरदस्तीने घेऊन जाणार्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणी गिरीश कदम वय 40 राहणार कदम बाग, सातारा यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अब्दुल्ला उस्मान मेमन वय 39, राहणार शनिवार पेठ, सातारा याने दिनांक 22 नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजता कदम यांच्या साईट वरून 30 हजार रुपये किमतीच्या सेंट्रींग बांधकामासाठी लागणार्या लोखंडी लहान- मोठ्या रिंगा कदम यांच्या संमतीशिवाय चोरून नेल्या आहेत. पोलीस हवालदार करपे अधिक तपास करत आहेत.


