maharashtra

आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा


तडीपारीचा आदेश बजावलेला सराईत गुन्हेगार लक्ष्मी टेकडी येथे स्वतःचे अस्तित्व लपवून राहत असल्याचा प्रकार समोर आला आहे. सुधीर तानाजी सावंत वय 19, रा. जय जवान सोसायटी, सदर बाजार सातारा असे त्याचे नाव आहे. सातारा शहर पोलिसांनी त्याला नोटीस बजावली आहे.

सातारा : तडीपारीचा आदेश बजावलेला सराईत गुन्हेगार लक्ष्मी टेकडी येथे स्वतःचे अस्तित्व लपवून राहत असल्याचा प्रकार समोर आला आहे. सुधीर तानाजी सावंत वय 19, रा. जय जवान सोसायटी, सदर बाजार सातारा असे त्याचे नाव आहे. सातारा शहर पोलिसांनी त्याला नोटीस बजावली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हद्दपार प्राधिकरण यांच्या आदेशानुसार सावंत याला एक वर्षासाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. तरी देखील आदेशाचा भंग करून सातारा जिल्ह्यात त्याचे येणे जाणे सुरू होते. कोणत्याही पूर्व परवानगीशिवाय तो लक्ष्मी टेकडी झोपडपट्टी सदर बाजार सातारा येथे रहात होता. याप्रकरणी सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये सावंत याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.