जबरी चोरीचा बनाव करुन नोकरानेच सुमारे 11 लाखांची रक्कम लांबविल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी संशयितास अटक करीत त्याने लंपास केलेली रक्कम हस्तगत करण्यात फलटण पोलिसांना यश आले आहे. जबरी चोरीचा हा बनाव संशयिताने त्याच्या मुलीच्या उपचारासाठी केल्याचे तपासात उघड झाले आहे.
वाई, ता. वाई येथे तीन घरफोडी करणाऱ्या संशयिताला सहा तासात वाई पोलिस ठाण्याच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून २ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून शेखर उर्फ चिंग्या अशोक घाडगे, वय ३३ रा. सोनजाई नगर वाईन असे त्याचे नाव आहे.
सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्याला एकरकमी एफ आर पी अधिक दोनशे रुपये मिळावेत, ही विविध शेतकरी संघटनाची मागणी आहे. या संदर्भात बुधवारी नियोजन भवनामध्ये आयोजित बैठकीला जिल्हा प्रशासनाने म्हणावा तसा प्रतिसाद न दिल्याने संतापलेल्या विविध संघटनेच्या शेतकरी सदस्यांनी या बैठकीवर बहिष्कार घातला. त्यामुळे एफ आर पी च्या संदर्भातील आयोजित बैठकीचा एकंदर फियास्को झाला.
पंढरपूर महामार्गावरील फलटण तालुक्यातील विडणी गावाच्या हद्दीत अब्दागिरेवाडी येथे डांबरी रस्ता सोडून सुमारे चाळीस फूट आतमध्ये असलेल्या घरामध्ये भरधाव वेगाने येणारा ट्रॅक्टर शेतकऱ्याच्या घरामध्ये घुसला असल्याची घटना नुकतीच घडली आहे.
सासकल, ता. फलटण येथील रामोशी समाजाच्या समाज बांधवांनी गायरान जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित करण्यापूर्वी आपले योग्य जागेवर पुनर्वसन करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे सासकल गावच्या सरपंच उषा राजेंद्र फुले यांच्याकडे केली आहे.
येथील देगाव रोड परिसरात असणाऱ्या एका चहाच्या टपरीच्या आडोशाला सुरु असलेल्या जुगार अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी १५ हजार २७२ रुपये रोख रक्कम, जुगाराचे साहित्य व तीन मोबाइल हस्तगत केले.
वर्ये, ता. सातारा येथील महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जामदार वाडी, ता. खटाव येथून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार पुसेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा शहर परिसरात असणाऱ्या एका गावातील महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी कोडोली सातारा येथील दोघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा येथील एका महाविद्यालयाजवळ एका युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी वाघोली, ता. कोरेगाव येथील एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.