वर्ये, ता. सातारा येथील महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : वर्ये, ता. सातारा येथील महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.१७ नोव्हेंबर रोजी ७.४५ वाजण्याच्या सुमारास वर्ये येथील एका महिलेवर चारित्र्याचा संशय घेऊन नितीन शंकर भेंडे यांनी दांडक्याने मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून धमकी दिल्याची तक्रार तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.