वाई, ता. वाई येथे तीन घरफोडी करणाऱ्या संशयिताला सहा तासात वाई पोलिस ठाण्याच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून २ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून शेखर उर्फ चिंग्या अशोक घाडगे, वय ३३ रा. सोनजाई नगर वाईन असे त्याचे नाव आहे.
सातारा : वाई, ता. वाई येथे तीन घरफोडी करणाऱ्या संशयिताला सहा तासात वाई पोलिस ठाण्याच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून २ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून शेखर उर्फ चिंग्या अशोक घाडगे, वय ३३ रा. सोनजाई नगर वाईन असे त्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २२ नोव्हेंबर रोजी १२.४५ ते दि. २३ नोव्हेंबर रोजी ६ वाजण्याच्या सुमारास वाई येथे डॉ. घोटावडेकर हॉस्पिटल, मधली आळी आणि शैलेंद्र देवकुळे यांच्या प्रसाद कंट्रक्शन येथील बंद फ्लॅटचे कुलूप अज्ञात चोरट्याने साहित्य चोरून नेल्याची तक्रार वाई पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पेट्रोलिंग करून संशयित चोरट्याचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली. दरम्यान बाळासाहेब भरणे यांना मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने शिंदे हायस्कूल समोर या गुन्ह्यातील संशयित दुचाकीवरून जात असताना दिसला. त्यांनी तात्काळ त्याला ताब्यात घेण्याच्या सूचना केल्या. पोलिसांना पाहताच तो पळून जात असल्याचे लक्षात येताच त्याला पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याच्याकडून २ लाख रुपयांचे हॉस्पिटलमधुन चोरलेले मशीन, व रोख रक्कम असा एकूण २ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
या कारवाईत पोलीस हवालदार विजय शिर्के, सोनाली माने, पोलीस कॉन्स्टेबल किरण निंबाळकर, श्रावण राठोड, प्रसाद दुदस्कर, अमित गोळे यांनी सहभाग घेतला.


