maharashtra

विनयभंग प्रकरणी वाघोली येथील एकावर गुन्हा


सातारा येथील एका महाविद्यालयाजवळ एका युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी वाघोली, ता. कोरेगाव येथील एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : सातारा येथील एका महाविद्यालयाजवळ एका युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी वाघोली, ता. कोरेगाव येथील एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.२१ रोजी १२.३० वाजण्याच्या सुमारास सातारा येथील एका महाविद्यालयाजवळ एक युवती तिच्या मैत्रिणीसह चहा पिण्यासाठी जात असताना अक्षय सुभाष मोरे, रा. वाघोली, ता. कोरेगाव हा तिच्या समोर आला. तू मला आवडतेस, तुझ्याशी बोलायचे आहे असे म्हणाल्याने त्या युवतीने त्याच्याशी बोलण्यास नकार दिल्याने तुला बघून घेतो असे म्हणत तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस नाईक वाघमारे अधिक तपास करीत आहेत.