येथील देगाव रोड परिसरात असणाऱ्या एका चहाच्या टपरीच्या आडोशाला सुरु असलेल्या जुगार अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी १५ हजार २७२ रुपये रोख रक्कम, जुगाराचे साहित्य व तीन मोबाइल हस्तगत केले.
सातारा : येथील देगाव रोड परिसरात असणाऱ्या एका चहाच्या टपरीच्या आडोशाला सुरु असलेल्या जुगार अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी १५ हजार २७२ रुपये रोख रक्कम, जुगाराचे साहित्य व तीन मोबाइल हस्तगत केले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील देगाव रोड मार्गावर असणाऱ्या चहा टपरीच्या आडोशाला महादेव सुतार, रा. खेड, ता. सातारा तसेच शाहरुख शेख, समीर कच्छी, रा. मोळाचा ओढा, सातारा हे तिघे जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून १५ हजार २७२ रुपये रोख रक्कम, जुगाराचे साहित्य व तीन मोबाइल हस्तगत केले.


