पुणे ते सातारा व तेथून खातगुण या प्रवासादरम्यान रेवलकरवाडी तालुका खटाव येथील 68 वर्षीय वृध्देचे दागिने प्रवासात चोरीस गेल्याची घटना समोर आली आहे.
सातारा : पुणे ते सातारा व तेथून खातगुण या प्रवासादरम्यान रेवलकरवाडी तालुका खटाव येथील 68 वर्षीय वृध्देचे दागिने प्रवासात चोरीस गेल्याची घटना समोर आली आहे.
याप्रकरणी सीताबाई रामचंद्र रा. रेवलकर वाडी, तालुका खटाव यांनी पुसेगाव पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
सीताबाई यांच्या जवळील पिशवीमध्ये 80 हजार रुपये किमतीच्या दोन तोळे वजनाची सोन्याची कंठी, पाच ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, पाच ग्रॅम वजनाची एक सोन्याची डिझाईनची चैन असा एक लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल होता. दिनांक 21 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा ते त्यांच्या राहत्या घरी खतगुण येथे चार वाजेपर्यंतच्या प्रवासादरम्यान त्यांच्याकडील एक लाख 85 हजार रुपये किमतीची सोन्याचे दागिन्याची पिशवी चोरीस गेली. त्यांच्या लगत बसलेल्या दोन महिलांवर त्यांनी संशय व्यक्त केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक येवले करीत आहेत.


