सिव्हिल हॉस्पिटल परिसरात भरणार्या मेडिकल कॉलेजच्या पार्किंग मधून 20 हजार रुपये किमतीची सुझुकी एक्सेस मोटार सायकल अज्ञाताने चोरून नेली. हा प्रकार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी चार या दरम्यान घडला आहे.
सातारा : सिव्हिल हॉस्पिटल परिसरात भरणार्या मेडिकल कॉलेजच्या पार्किंग मधून 20 हजार रुपये किमतीची सुझुकी एक्सेस मोटार सायकल अज्ञाताने चोरून नेली. हा प्रकार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी चार या दरम्यान घडला आहे.
सादिक सब्बीर शेख वय 46, राहणार गोविंद आर्केड, जुना आरटीओ ऑफिस जवळ सातारा यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सादिक शेख हे येथे नोकरीला असून त्यांनी नेहमी प्रमाणे मेडिकल कॉलेजच्या आवारातील कॅम्पस मध्ये आपली सुझुकी गाडी लावली होती. ती अज्ञात चोरट्याने चोरून नेली. सायंकाळी घरी जाण्यासाठी ते पार्किंग मध्ये आले असता त्यांना त्यांची गाडी आढळून आली नाही. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंद करण्यात आला असून पोलीस हवालदार पवार अधिक तपास करत आहेत.