maharashtra

महामार्गावर दुचाकीवर स्टंटबाजी करणाऱ्या दोघांवर कारवाई


पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी वर उभे राहून स्टंटबाजी करणाऱ्या दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाई केली.

सातारा : पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी वर उभे राहून स्टंटबाजी करणाऱ्या दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाई केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ओंकार हनुमंत शिंदे, वय १९ आणि ओंकार आनंदराव सोनमळे, वय १९
दोघेही रा. लिंब, ता. सातारा हे दोघे दि. २२ नोव्हेंबर रोजी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी वेगात चालवून दुचाकीवर उभे राहून स्टंट केलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. संबंधित दोघांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना दिल्या होत्या. पोलीस कर्मचारी पवार, हजबे आणि जगताप यांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील तरुणांची माहिती घेऊन त्यांना शोधून काढले. त्यांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.