धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते, आ. अजित पवार यांच्या पुतळ्याचा सातारा येथील अजिंक्यतारा किल्ल्यावरून कडेलोट करण्यात आला.
यापूर्वी एक जीआर केला आहे त्यानुसार सैनिक जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नियुक्त केली आहे. आज ॲट्रासिटी जसा कायदा आहे, त्याचप्रमाणे सैनिक संरक्षण कायदा करण्याची मागणी लवकरच केंद्र सरकारकडे करणार असल्याची माहिती सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष सुधीर सावंत (निवृत्त ब्रिगेडिअर) यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आक्षेपार्ह विधान केले. याचा निषेध म्हणून सातारा शहरात भारतीय जनता पार्टी सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी यांच्या नेतृत्वाखाली निषेध करत जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
नामदेव समाजोन्नती परिषद व जनश्री फौंडेशन म्हसवड जि सातारा यांचे वतीने राज्यातील रक्ताचा तुटवडा व काळाची गरज ओळखून दि ८ जानेवारी २०२३ रविवार रोजी म्हसवड येथील संत नामदेव मंदिर कोष्टी गल्ली येथे सकाळी नऊ ते दुपारी दोन पर्यंत भव्य रक्तदान शिबीर
विनापरवाना खाजगी जागेत प्रवेश केला म्हणून तिघांनी एका व्यावसायिकाला लाथा बुक्क्याने मारहाण केल्याची घटना 30 डिसेंबर रोजी दुपारी अडीचच्या दरम्यान घडली आहे.
शिवराज पेट्रोल पंप परिसरातील हॉटेल कोकण किंग च्या समोर हुल्लडबाजी करणाऱ्या तीन तरुणांना पोलिसांनी हटकले असता रागाच्या भरात त्या तरुणांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला करून त्यातील एकाच्या डोळ्याला गंभीर दुखापत केली आहे.
धनगरवाडी, तालुका खंडाळा येथे 31 डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजता अज्ञाताने खोलीचा दरवाजा ढकलून चाकूच्या धाकाने महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन व कानातील कर्णफुले जबरदस्तीने काढून घेतली आणि कपाटातील रोख रक्कम असा 65000 चा मुद्देमाल लांबवला.
वाई एसटी आगारामध्ये सक्रिय असणाऱ्या वाहकाने दोन अल्पवयीन मुलींचा गर्दीचा फायदा घेऊन विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे.
वीज वितरण कंपनीच्या परवानगीशिवाय परस्पर आकडा टाकून विजेची चोरी करणाऱ्या दोघांवर दोन स्वतंत्र घटनांमध्ये म्हसवड आणि दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अज्ञात वाहनाने नागठाणे गावच्या हद्दीत धडक दिल्याने गंभीर जखमी झालेले सदाशिव दिनकर काकडे वय 48, रा. वेणेगाव, तालुका सातारा हे मयत झाले आहेत.