maharashtra

म्हसवड येथे जागा प्रवेशावरून तिघांची एकाला मारहाण


विनापरवाना खाजगी जागेत प्रवेश केला म्हणून तिघांनी एका व्यावसायिकाला लाथा बुक्क्याने मारहाण केल्याची घटना 30 डिसेंबर रोजी दुपारी अडीचच्या दरम्यान घडली आहे.

सातारा : विनापरवाना खाजगी जागेत प्रवेश केला म्हणून तिघांनी एका व्यावसायिकाला लाथा बुक्क्याने मारहाण केल्याची घटना 30 डिसेंबर रोजी दुपारी अडीचच्या दरम्यान घडली आहे.
याप्रकरणी अर्जुन गणपत चोपडे वय 45 राहणार म्हसवड तालुका माण यांनी म्हसवड पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. विशाल अविनाश पोळ, प्रसाद अनिल पोळ दोघे राहणार म्हसवड व सुरज पोळ राहणार दहिवडी तालुका माण या तिघांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार फिर्यादीचे सोबत भाऊ सुरेश चोपडे, मच्छिंद्र चोपडे, पुतण्या मंगेश चोपडे यांचे न्यायालयामध्ये जमिनीच्या वरून वाद सुरू आहेत. 23 डिसेंबर 2022 रोजी न्यायालयाने हॉटेल सागर जवळील जागेतून शेतात जाण्याची मुभा फिर्यादीला दिली होती. मात्र आरोपी विशाल, प्रसाद आणि सुरज यांनी संगणमत करून तुम्ही या ठिकाणाहून जायचे नाही, गेला तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन आरोपीचा हात धरून ढकलून त्यांना खाली पाडले. या ठिकाणाहून तुम्हाला रस्ताही देणार नाही, अशी दमदाटी करून शेतात प्रवेश करण्यासाठी प्रतिबंध केला. पोलीस हवालदार एस.एम. जाधव तपास करत आहेत.