Satara

esahas.com

राज्य सरकार अस्थिर : पृथ्वीराज चव्हाण

राज्यामध्ये अस्थिर स्थिती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितपणेच लढणार असल्याने सरकार निवडणुका घेण्याचे सध्या तरी धाडस दाखवत नाही, असा घणाघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता केला.

esahas.com

अल्पवयीन मुलीचे अपहरण

खामकरवाडी, ता. कोरेगाव येथील राहत्या घरातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी नितीन अभिमान मोरे, रा. झापेवाडी, ता. शिरूर कासार, जि. बीड याच्या विरोधात वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

सातारा शहर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  भैय्या असे त्याचे नाव असून पूर्ण नाव समजू शकले नाही.

esahas.com

भुईंज येथे भिंत अंगावर पडून वृद्धाचा मृत्यू

भुईंज, तालुका वाई येथे वृद्धाच्या अंगावर अचानक भिंत पडून त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. ही घटना 30 डिसेंबर रोजी सायंकाळी पावणे पाचच्या दरम्यान घडली. सदाशिव महादेव क्षीरसागर वय 83 राहणार रायगाव, तालुका जावळी असे मयत झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

esahas.com

जुन्या भांडणाच्या कारणातून करंडी येथे महिलेला कुऱ्हाडीने मारहाण

जुन्या भांडणाच्या कारणातून 49 वर्षीय महिलेला कुऱ्हाडीने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना गुरुवार दिनांक 29 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान करंडी तालुका सातारा येथे घडली आहे. यामध्ये सुनीता नामदेव जाधव या जखमी झाल्या असून त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

esahas.com

'त्या' मृतदेहाचा डीएनए नमुना ठेवला

वाढे, ता. सातारा येथे मातीत अर्धवट पुरलेला मृतदेह शुक्रवारी आढळून आल्याने खळबळ उडाली होती. तो मृतदेह कोणाचा आहे, याबाबत अद्याप ठोस धागेदोरे पोलिसांना मिळाले नाहीत. दरम्यान, त्या मृतदेहाचा डीएनए नमुना घेतला आहे. तसेच शवविच्छेदन केले असून, या अहवालातून खून झाला की काय, ही माहिती समोर येईल.

esahas.com

बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या टोळीचा एलसीबी कडून पर्दाफाश

बेकायदेशीररित्या शस्त्रे बाळगून त्याची परस्पर विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार सदस्यांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून आठ काडतूस, चार पिस्टल, एक मॅक्झिन, तीन मोबाईल, दोन मोटरसायकल असा चार लाख 18 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

esahas.com

फलटण येथे फेरीवाल्यांचे आंदोलन

फलटण, ता. फलटण येथे रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांचे अतिक्रमण हटवल्याने विक्रेत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात नगरपालिका व अतिक्रमण हटाव विभागाच्या विरोधात आंदोलन केली. यावेळी छोट्या व्यापाऱ्यांच्या नुकसानाला जबाबदार कोण, असा खडा सवाल त्यांनी केला.

esahas.com

तक्रारदाराला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांची चौकशी करा : आ. शशिकांत शिंदे

मुंबई कृषी समितीच्या शौचालयाबाबत तक्रार करणाऱ्या तक्रारदाराला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांची चौकशी करा, अशी मागणी आ. शशिकांत शिंदे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केली.

esahas.com

छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर आणि धर्मरक्षकच : गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई

छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर आणि धर्मरक्षकच आहेत, असे प्रत्युत्तर शनिवारी गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना दिले. तर फडणवीस यांनी छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक तर होतेच, शिवाय धर्मवीरही होते, असे म्हणत अजित पवार यांना उत्तर दिले.