खामकरवाडी, ता. कोरेगाव येथील राहत्या घरातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी नितीन अभिमान मोरे, रा. झापेवाडी, ता. शिरूर कासार, जि. बीड याच्या विरोधात वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : खामकरवाडी, ता. कोरेगाव येथील राहत्या घरातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी नितीन अभिमान मोरे, रा. झापेवाडी, ता. शिरूर कासार, जि. बीड याच्या विरोधात वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २९ डिसेंबर रोजी ६ वाजण्याच्या सुमारास खामकरवाडी येथील राहत्या घरातून एका अल्पवयीन मुलीचे नितीन मोरे यांनी अपहरण केल्याची तक्रार त्या मुलीच्या पालकांनी वाठार पोलीस ठाण्यात दिली आहे. मोरे याच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्याला अद्याप अटक करण्यात आली नाही.