खिंडवाडी, तालुका सातारा येथे राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी कंटेनरला धडकून झालेल्या अपघातात दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
सातारा : खिंडवाडी, तालुका सातारा येथे राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी कंटेनरला धडकून झालेल्या अपघातात दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आदेश साळुंखे वय 21 रा. दुसाळे, ता. पाटण आणि पारस डफळे वय १६ रा. वजरोशी, ता. पाटण हे दोन युवक दुचाकी सर्विसिंग करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरून सातारा कडे येत होते. दुपारी तीन-चार च्या दरम्यान खिंडवाडी नजीक त्यांची दुचाकी कंटेनरला पाठीमागून धडकली. या अपघातात पारस डफळे आणि आदेश साळुंखे या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
आदेश साळुंखे हा लष्कराच्या भरतीत पास झाला होता. थोड्याच दिवसात तो ट्रेनिंग साठीही जाणार होता. मात्र लष्करात भरती होण्याचे त्याचे स्वप्न हे स्वप्नच राहिले.
या दोघांच्या अपघाती मृत्यूमुळे दुसाळे आणि वजरोशी परिसरात शोककळा पसरली आहे.


