सातारा शहर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भैय्या असे त्याचे नाव असून पूर्ण नाव समजू शकले नाही.
सातारा : सातारा शहर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भैय्या असे त्याचे नाव असून पूर्ण नाव समजू शकले नाही.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सन २०२२ मध्ये (पीडित मुलीला नक्की तारीख, वेळ माहित नाही) धनगरवाडी, (कोडोली) ता. सातारा परिसरात वास्तव्य करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीशी भैय्या नामक मुलाने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने त्यात ती गरोदर राहिली. तिला एक अपत्य झाले असून पीडित अल्पवयीन मुलीच्या वतीने महिला पोलीस नाईक मंदाकिनी धनाजी अवघडे यांनी याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर भैय्या नामक मुलावर पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.


