maharashtra

भुईंज येथे भिंत अंगावर पडून वृद्धाचा मृत्यू


भुईंज, तालुका वाई येथे वृद्धाच्या अंगावर अचानक भिंत पडून त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. ही घटना 30 डिसेंबर रोजी सायंकाळी पावणे पाचच्या दरम्यान घडली. सदाशिव महादेव क्षीरसागर वय 83 राहणार रायगाव, तालुका जावळी असे मयत झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

सातारा : भुईंज, तालुका वाई येथे वृद्धाच्या अंगावर अचानक भिंत पडून त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. ही घटना 30 डिसेंबर रोजी सायंकाळी पावणे पाचच्या दरम्यान घडली. सदाशिव महादेव क्षीरसागर वय 83 राहणार रायगाव, तालुका जावळी असे मयत झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
संतोष लक्ष्‍मण क्षीरसागर  राहणार रायगाव यांनी याप्रकरणी घटनेची खबर भुईंज पोलिसांना दिली आहे. शुक्रवारी दुपारी अडीचच्या दरम्यान वेताळ वस्ती रायगाव येथे  महादेव क्षीरसागर यांच्या घराच्या छपराच्या भिंतीच्या आडोशाला सदाशिव क्षीरसागर हे थांबले होते. त्यावेळी अचानक भिंत त्यांच्या अंगावर पडली असता त्यांच्या डोक्याला आणि दोन्ही हाताच्या कोपरांना  जबर दुखापत होऊन ते जागीच मयत झाले. पो. हवालदार घाडगे अधिक तपास करत आहेत.