oldmandiesafterwallfallsonhim

esahas.com

भुईंज येथे भिंत अंगावर पडून वृद्धाचा मृत्यू

भुईंज, तालुका वाई येथे वृद्धाच्या अंगावर अचानक भिंत पडून त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. ही घटना 30 डिसेंबर रोजी सायंकाळी पावणे पाचच्या दरम्यान घडली. सदाशिव महादेव क्षीरसागर वय 83 राहणार रायगाव, तालुका जावळी असे मयत झालेल्या वृद्धाचे नाव आहे.