maharashtra

फलटण येथे फेरीवाल्यांचे आंदोलन


फलटण, ता. फलटण येथे रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांचे अतिक्रमण हटवल्याने विक्रेत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात नगरपालिका व अतिक्रमण हटाव विभागाच्या विरोधात आंदोलन केली. यावेळी छोट्या व्यापाऱ्यांच्या नुकसानाला जबाबदार कोण, असा खडा सवाल त्यांनी केला.

सातारा : फलटण, ता. फलटण येथे रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांचे अतिक्रमण हटवल्याने विक्रेत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात नगरपालिका व अतिक्रमण हटाव विभागाच्या विरोधात आंदोलन केली. यावेळी छोट्या व्यापाऱ्यांच्या नुकसानाला जबाबदार कोण, असा खडा सवाल त्यांनी केला.
जागे अभावी फलटण येथे अनेक विक्रेते, व्यापारी रस्त्याकडेलच आपली दुकाने लावून व्यवसाय करत असतात. आज फलटण नगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने रस्त्यावर दुकाने लावून व्यवसाय करणाऱ्या विक्रेते व छोटे व्यापाऱ्यांची अतिक्रमणे काढल्यामुळे संतप्त झालेल्या विक्रेत्यांनी फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात धरणे आंदोलन करून पालिकेचा तीव्र शब्दात निषेध केला.
कोरोनापूर्वी म्हणजेच दोन वर्षांपूर्वी फलटण नगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने अशाच पद्धतीने छोटे विक्रेते व व्यापाऱ्यांची अतिक्रमणे काढून मोठ्या व्यापाऱ्यांना अभय दिले होते. छोट्या विक्रेत्यांना आपला व्यवसाय करण्यासाठी जागा न देता उलट त्यांनाच हुसकावून लावण्याचा अधिकार पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना कोणी दिला, असा प्रश्न उपस्थित करत वेळ पडल्यास नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात मुख्यमंत्र्यांपर्यंत जावे लागले तरी चालेल, असा इशारा विक्रेत्यांनी दिला.