वाढे, ता. सातारा येथे मातीत अर्धवट पुरलेला मृतदेह शुक्रवारी आढळून आल्याने खळबळ उडाली होती. तो मृतदेह कोणाचा आहे, याबाबत अद्याप ठोस धागेदोरे पोलिसांना मिळाले नाहीत. दरम्यान, त्या मृतदेहाचा डीएनए नमुना घेतला आहे. तसेच शवविच्छेदन केले असून, या अहवालातून खून झाला की काय, ही माहिती समोर येईल.
सातारा : वाढे, ता. सातारा येथे मातीत अर्धवट पुरलेला मृतदेह शुक्रवारी आढळून आल्याने खळबळ उडाली होती. तो मृतदेह कोणाचा आहे, याबाबत अद्याप ठोस धागेदोरे पोलिसांना मिळाले नाहीत. दरम्यान, त्या मृतदेहाचा डीएनए नमुना घेतला आहे. तसेच शवविच्छेदन केले असून, या अहवालातून खून झाला की काय, ही माहिती समोर येईल.
माजी आ. कांताताई नलावडे यांच्या वाढे येथील बंगल्यानजीक शुक्रवारी अर्धवट पुरलेला मृतदेह आढळून आला. तो कुजलेल्या स्थितीत असल्याने ही माहिती समोर येताच खळबळ उडाली. या मृतदेह महिलेचा की पु.रुषाचा, हेही समोर आले नाही. याबाबतची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे. याबाबत पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके तपास करत आहेत. आज परिसरातील लोकांकडे माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्याबाबत पोलिसांच्या हाती ठोस माहिती मिळाली नाही.
मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या अहवालातून हा घातपात आहे की काय, याबाबत माहिती पुढे येईल. तसेच हा मृतदेह कोणाचा आहे, याची तांत्रिक माहिती समोर येण्यासाठी डीएनएचा नमुनाही घेण्यात आला आहे.


