जुन्या भांडणाच्या कारणातून 49 वर्षीय महिलेला कुऱ्हाडीने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना गुरुवार दिनांक 29 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान करंडी तालुका सातारा येथे घडली आहे. यामध्ये सुनीता नामदेव जाधव या जखमी झाल्या असून त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सातारा : जुन्या भांडणाच्या कारणातून 49 वर्षीय महिलेला कुऱ्हाडीने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना गुरुवार दिनांक 29 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान करंडी तालुका सातारा येथे घडली आहे. यामध्ये सुनीता नामदेव जाधव या जखमी झाल्या असून त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार सुनिता जाधव या सायंकाळचे काम आटोपून त्यांच्या ओळखीच्या महिलेच्या घराजवळ गप्पा मारत असताना ज्ञानदेव जाधव, आनंद जाधव व निलेश जाधव या तिघांनी मिळून जाधव यांना जुन्या भांडणाच्या कारणातून कुऱ्हाडीच्या साह्याने बेदम मारहाण केली. यामध्ये त्यांच्या डोक्याला आणि डाव्या हाताला दुखापत झाली असून त्या जखमी झाल्या आहेत. या मारहाण प्रकरणामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जखमी झालेल्या सुनिता जाधव यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालय सातारा येथे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस निरीक्षक एस. डी. दळवी अधिक तपास करत आहेत.


