maharashtra

वीज वितरणच्या विजेची बेकायदा चोरी करणाऱ्या दोघांवर गुन्हा


वीज वितरण कंपनीच्या परवानगीशिवाय परस्पर आकडा टाकून विजेची चोरी करणाऱ्या दोघांवर दोन स्वतंत्र घटनांमध्ये म्हसवड आणि दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : वीज वितरण कंपनीच्या परवानगीशिवाय परस्पर आकडा टाकून विजेची चोरी करणाऱ्या दोघांवर दोन स्वतंत्र घटनांमध्ये म्हसवड आणि दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शंकर बाबुराव काटकर वय 65, राहणार कुकुडवाड, तालुका माण यांनी स्वतःच्या फायद्या करता येथील ढाब्याच्या शेजारी जाणाऱ्या इलेक्ट्रिक पोल वरील लघुवाहिनीवर काळ्या रंगाच्या वायरचा आकडा टाकून स्वतःच्या ढाब्यात अनधिकृत वीज वापरली. यात महावितरण कंपनीचे मागील चार महिन्याचे 632 युनिट चे वीज बिल 15740 रुपये झाले आणि तडजोड रक्कम दहा हजार असे 25 हजार 740 रुपयांचे मोफत विजेचा वापर केला म्हणून त्यांच्यावर तक्रार दाखल झाली आहे. पोलीस हवालदार खाडे तपास करत आहेत.
दहिवडी येथे शिंदी, तालुका माण येथील विजय विनायक भोसले यांनी त्यांच्या घरासमोरील विद्युत पोल वरून वायरचा आकडा टाकून वीज वापरताना आढळून आले. धीरज कुमार आनंद पवार यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हवालदार एन. एम. कोळेकर तपास करत आहेत.