अज्ञात वाहनाने नागठाणे गावच्या हद्दीत धडक दिल्याने गंभीर जखमी झालेले सदाशिव दिनकर काकडे वय 48, रा. वेणेगाव, तालुका सातारा हे मयत झाले आहेत.
सातारा : अज्ञात वाहनाने नागठाणे गावच्या हद्दीत धडक दिल्याने गंभीर जखमी झालेले सदाशिव दिनकर काकडे वय 48, रा. वेणेगाव, तालुका सातारा हे मयत झाले आहेत. याप्रकरणी डॉक्टर विजय गवळी सिविल हॉस्पिटल सातारा यांनी घटनेची खबर बोरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 28 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता सदाशिव काकडे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नागठाणे येथील आमंत्रण हॉटेल पेट्रोल पंपा समोर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना ॲम्बुलन्स ने उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे आणण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सहाय्यक फौजदार देसाई अधिक तपास करत आहेत.


