धनगरवाडी, तालुका खंडाळा येथे 31 डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजता अज्ञाताने खोलीचा दरवाजा ढकलून चाकूच्या धाकाने महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन व कानातील कर्णफुले जबरदस्तीने काढून घेतली आणि कपाटातील रोख रक्कम असा 65000 चा मुद्देमाल लांबवला.
सातारा : धनगरवाडी, तालुका खंडाळा येथे 31 डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजता अज्ञाताने खोलीचा दरवाजा ढकलून चाकूच्या धाकाने महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन व कानातील कर्णफुले जबरदस्तीने काढून घेतली आणि कपाटातील रोख रक्कम असा 65000 चा मुद्देमाल लांबवला.
याप्रकरणी सावित्री कुंभार वय 80 राहणार धनगरवाडी तालुका खंडाळा यांनी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार फिर्यादी रात्री घरात झोपला असताना अज्ञात व्यक्ती खोलीचा दरवाजा ढकलून आत आला आणि त्याने मोठ्या आकाराच्या सूऱ्याचा धाक दाखवून कुंभार यांच्या गळ्यातील सोन्याची चैन कानातील कर्णफुले आणि कपाटातील रोख रक्कम असा 65 हजाराचा मुद्देमाल घेऊन तेथून पलायन केले.
या प्रकरणाची कोरेगाव उपअधीक्षक गणेश किंद्रे यांनी गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी या लूटमारीच्या संदर्भात वेगाने तपास सुरू केला आहे. पोलीस निरीक्षक एम. के. बधे अधिक तपास करत आहेत.


