भारत संचार निगम लिमिटेड च्या वतीने सातारा जिल्ह्यामध्ये फोर-जी आणि फाईव्ह-जी सेवा सुरू करण्यात येत असून पहिल्या टप्प्यांमध्ये सातारा जिल्ह्यातील 178 गावांमध्ये फोर-जी सेवा सुरू करण्यात येणार आहे.
पुणे येथील भिडे वाडा येथे स्मारक उभारणीबाबत सर्वबाबींची पुर्तता करुन दोन महिन्यात स्मारकाचे भूमिपूजन केले जाईल. या स्मारकाच्या माध्यमातून अनेकांना समाजकार्याची प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर ढेबेवाडी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फलटण शहरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे 55 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वाई, ता. वाई येथील धोम कॉलनीत घरफोडी करून स्टीलचे नळ, गॅसचे दोन बर्नर असा २१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
दारू पिऊन शिवीगाळ केल्याप्रकरणी महिलेने एकाच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
कृष्णानगर, ता. सातारा येथून एक जण बेपत्ता झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
पाटखळ माथा, ता. सातारा येथे दुचाकीने तवेराला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तीन जखमी झाले असून त्यापैकी दोघांना जबर मार लागला आहे. जखमींवर सातारा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सातारा पंचायत समितीचे माजी उपसभापती जितेंद्र सावंत, रा. लिंब, ता. सातारा यांच्यावर रविवारी रात्री प्राणघातक हल्ला झाला. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांना सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.