दारू पिऊन शिवीगाळ केल्याप्रकरणी महिलेने एकाच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
सातारा : दारू पिऊन शिवीगाळ केल्याप्रकरणी महिलेने एकाच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १ जानेवारी २०२३ रोजी १.३० वाजण्याच्या सुमारास सातारा येथील रविवार पेठेत असणाऱ्या जुनी भाजी मंडई येथे अविनाश पवार उर्फ पप्पू रा. भीमाबाई आंबेडकर झोपडपट्टी, सदरबझार, सातारा याने पूजा जावेद सय्यद, रा. भीमाबाई आंबेडकर झोपडपट्टी, सातारा या महिलेला काही कारण नसताना दारू पिऊन शिवीगाळ केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


