maharashtra

फलटण शहरात 55 हजारांची घरफोडी


फलटण शहरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे 55 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

सातारा : फलटण शहरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे 55 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 ते 29 डिसेंबर दरम्यान अज्ञात चोरट्याने मिलिंद वसंतराव बोराटे रा. शिंदे मळा, फलटण, ता. फलटण यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा 55 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या घटनेची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस हवालदार नाळे करीत आहेत.