शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 31 डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास प्रकाश गुलाब कांबळे वय 34, रा. आदर्की खुर्द, ता. फलटण हे त्यांच्या गावच्या हद्दीतील चंदरबाबा मळा येथे असणाऱ्या प्रदीप निंबाळकर यांच्या दुकानात चिकन आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्याच गावातील गणेश लक्ष्मण जाधव, अशोक चंदर जाधव, संजय चंदर जाधव, अक्षय चंदर जाधव या चौघांनी कांबळे यांना शिवीगाळ करीत हाताने, लाथाबुक्क्यांनी तसेच लोखंडी रॉडने मारहाण केली. याबाबतची फिर्याद लोणंद पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून फलटण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बरडे अधिक तपास करीत आहेत.


