maharashtra

सातारा पंचायत समितीचे माजी उपसभापती जितेंद्र सावंत यांच्यावर प्राणघातक हल्ला


सातारा पंचायत समितीचे माजी उपसभापती जितेंद्र सावंत, रा. लिंब, ता. सातारा यांच्यावर रविवारी रात्री प्राणघातक हल्ला झाला. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांना सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

सातारा : सातारा पंचायत समितीचे माजी उपसभापती जितेंद्र सावंत, रा. लिंब, ता. सातारा यांच्यावर रविवारी रात्री प्राणघातक हल्ला झाला. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांना सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, रविवारी रात्री लिंब, ता.सातारा येथे साडेदहा वाजण्याच्या सुमारास शेतामध्ये युवकांच्या टोळक्याने धारदार कोयत्यासारख्या शस्त्राने माजी उपसभापती जितेंद्र शिंदे यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या चेहऱ्यावर, मानेवर वार झाले असून त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना गंभीर जखमी अवस्थेत सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे. हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.