अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर ढेबेवाडी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर ढेबेवाडी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पाटण तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून महेश किसन मस्कर रा. मस्करवाडी, काळगाव, ता. पाटण याने अत्याचार केले. यात संबंधित मुलगी गरोदर राहिली आहे. याबाबतची फिर्याद ढेबेवाडी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. आर. पवार करीत आहेत.