पाटखळ माथा, ता. सातारा येथे दुचाकीने तवेराला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तीन जखमी झाले असून त्यापैकी दोघांना जबर मार लागला आहे. जखमींवर सातारा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सातारा : पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खिंडवाडी नजीक रविवारी सायंकाळी ४.३० वाचण्याच्या सुमारास दुचाकीने कंटेनरला पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पाटखळ माथा, ता. सातारा येथे दुचाकीने तवेराला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तीन जखमी झाले असून त्यापैकी दोघांना जबर मार लागला आहे. जखमींवर सातारा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, आज दुपारच्या सुमारास तवेरा क्रमांक एम. एच. ०६ एझेड १०४९ वरील चालक तवेरा गाडी घेऊन पाली येथून निराकडे जात होता. तवेरा पाटखळ माथा फाट्यानजिक आली असता चालक तवेरा जेवणासाठी रस्त्याकडेला थांबवत असताना फलटण करून सातारकडे वेगात येणाऱ्या दुचाकी क्रमांक एम.एच.४२ एझेड १४०१ ने तवेराला पुढून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तीन जण जखमी झाली असून त्यापैकी दोघांना जबर मार लागला आहे. जखमी झालेल्या युवकांची नावे समजू शकले नाहीत मात्र ते बारामती येथील असल्याचे सांगण्यात येते. त्यांच्यावर सातारा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली असून पोलिसांनी कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
दुचाकीसह तवेरा गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
दुचाकीवरील युवक काचेवर आदळला
बारामती येथील तीन युवक भरधाव वेगाने दुचाकीवरून येत असताना पाटखळ माथा फाट्यानजिक दुचाकीने तवेराला पुढून धडक दिल्यानंतर दुचाकीचा चालक तवेराच्या काचेवर आदळल्यामुळे काच फुटली. आधी काचेवर नंतर बोनेटवर पडून खाली पडल्याने तो रक्तबंबाळ झाला होता. या अपघातात दुचाकीसह तवेरा गाडीचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघातानंतर तवेरा गाडी सातारा तालुका पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहे.


