maharashtra

हुल्लडबाज तरुणांचा दोन पोलिसांवर हल्ला


शिवराज पेट्रोल पंप परिसरातील हॉटेल कोकण किंग च्या समोर हुल्लडबाजी करणाऱ्या तीन तरुणांना पोलिसांनी हटकले असता रागाच्या भरात त्या तरुणांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला करून त्यातील एकाच्या डोळ्याला गंभीर दुखापत केली आहे.

सातारा : शिवराज पेट्रोल पंप परिसरातील हॉटेल कोकण किंग च्या समोर हुल्लडबाजी करणाऱ्या तीन तरुणांना पोलिसांनी हटकले असता रागाच्या भरात त्या तरुणांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला करून त्यातील एकाच्या डोळ्याला गंभीर दुखापत केली आहे.
अक्षय लालासो पवार वय 28 राहणार खंडोबाचा माळ रविवार पेठ, अर्जुन पवार राहणार रविवार पेठ व श्रीकांत शिंदे राहणार विलासपूर या तिघांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना 31 डिसेंबर रोजी रात्री सव्वा एकच्या दरम्यान घडली. फिर्यादीच्या तक्रारीनुसार संतोष ज्ञानोबा शेलार वय 38 राहणार खेड तालुका जिल्हा सातारा व पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे यांचे शिवराज ढाबा परिसरात पेट्रोलिंग सुरू होते. त्यावेळी संबंधितांनी हुल्लडबाजी करणाऱ्या अक्षय पवार श्रीकांत शिंदे यांना हटकले. त्यावेळेला या तिघांनी मिळून फिर्यादीचे दोन्ही हात घट्ट पकडून त्याच्या हातातील वाहनाच्या लोखंडी चावीने डाव्या डोळ्यावर जोरदार प्रहार करून गंभीर जखमी केले तसेच सरकारी गणवेशाची ओढाताण करून फिर्यादी शेलार यांना धक्काबुक्की केली. सरकारी कामकाजात अडथळा आणल्या प्रकरणी या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.