health

डोकेदुखीचे 4 प्रकार आहेत, यातील तुम्हाला होणारी डोकेदुखी कोणत्या प्रकारची? जाणून घ्या


There are 4 types of headaches, which type of headache do you get? Find out
डोकेदुखीच्या या चार प्रकारांबद्दल जाणून घेऊया संपूर्ण माहिती. डोकेदुखीची समस्या आपल्यापैकी सर्वांनाच आयुष्यात एकदा तरी येतेच. तर काही लोकांना नेहमीच हा त्रास उद्भवतो. परंतु हा मागील कारण बऱ्याच लोकांना माहित नसतं. आपल्यापैकी बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की, डोकेदुखी ही एकाच प्रकारची असते. परंतु तसे नाही. अहवालानुसार, डोकेदुखीचे 150 प्रकार आहेत. ज्यांना आपण 4 भागांमधून समजू घेऊ, ज्यामुळे आपल्याला हे समजणं सोप्पं जाईल.

तसेच हे देखील लक्षात घ्या की, आपल्याला सगळ्यांना या 4 प्रकारांमध्ये डोकेदुखी होते, ज्यामुळे त्यांच्यावर उपचार देखील वेगवेगळाच करावा लागतो. चला तर मग जाणून घेऊया, डोकेदुखीच्या या चार प्रकारांबद्दल.

मायग्रेन, तणाव, क्लस्टर आणि सायनस हे डोकेदुखीचे 4 प्रकार आहेत. आता हे कशामुळे होतं आणि यामुळे डोकं कोणत्या भागात दुखतं? हे समजून घेऊ.
मायग्रेन (Migraine Headache)
मायग्रेन हा डोकेदुखीचा पहिला प्रकार आहे. जेव्हा आपलं डोकं, मायग्रेनमुळे दुखू लागतं तेव्हा आपल्याला डोक्याच्या कोणत्याही एका बाजूला वेदना होतात. तसेच मायग्रेनचा त्रास बहुतांश महिलांना उद्भवतो. या डोकेदुखीचा परिणाम डोळ्यांच्या दृष्टीवरही होऊ शकतो. मायग्रेनचा त्रास असलेले रुग्ण प्रकाश आणि आवाजासाठी खूप संवेदनशील असतात. म्हणजेच मायग्रेनची समस्या असलेल्या रुग्णांना प्रकाश आणि आवाजाचा त्रास होतो.

तणाव (Tension or Stress Headache)
तणावामुळे डोकेदुखी होते, तेव्हा डोक्याच्या दोन्ही बाजूला वेदना होतात. सहसा या वेदना 7 दिवस ते 30 दिवस असतात. या प्रकारच्या वेदना डोक्याच्या दोन्ही बाजूंना हळूहळू वाढतात. तणाव, शरीरात पाण्याची कमतरता किंवा स्नायूंमध्ये अडचण आल्याने डोकेदुखीच्या वेदना होतात. म्हणून या तीन घटकांपासून स्वतःचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे तुम्हाला हा त्रास होणार नाही.
क्लस्टर (Cluster Headache)
क्लस्टर डोकेदुखीचा परिणाम डोळ्यांवर स्पष्टपणे दिसून येतो. हे अधूनमधून घडत असते. जेव्हा क्लस्टर डोकेदुखाच्या वेदना होतात तेव्हा अस्वस्थता जाणवते, डोळ्यातून अश्रू येतात आणि नाक बंद होते. अशी वेदना दिवसातून आठ वेळा किंवा त्यापासून जास्त होते.

क्लस्टर डोकेदुखी दोन आठवडे ते तीन महिन्यांपर्यंत असू शकते. हवामानातील बदल, मद्यपान आणि धूम्रपान हे याचे कारण असू शकते.

सायनस (sinus Headache)
सायनसमुळे होणारी डोकेदुखी ही डोळ्यांच्या आजूबाजूला होते. यामुळे नाक बंद होते. सहसा या वेदनांचे कारण जीवाणू किंवा ऍलर्जी असू शकते.  म्हणून, जेव्हा जेव्हा तुम्हाला डोकेदुखी जाणवते तेव्हा वैद्यकीय सल्ला घ्या जेणेकरून त्यावर योग्य उपचार करता येतील.