sports

कोरोनावर मात करणारा ‘हिंदवी’चा अभिनव शिक्षण प्रयोग

प्रवेशाला उत्स्फूर्त प्रतिसाद : गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा, सहामाही परीक्षा यशस्वी

सध्या कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदवी पब्लिक स्कूलची ‘ऑनलाईन’ डिजिटल शाळा सुरू आहे. शिक्षकांनी हातात हात घालून दर्जेदार शिक्षणाची परंपरा अखंडित ठेवल्याने नवीन प्रवेशासाठी विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

सातारा : सध्या कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदवी पब्लिक स्कूलची ‘ऑनलाईन’ डिजिटल शाळा सुरू आहे. शिक्षकांनी हातात हात घालून दर्जेदार शिक्षणाची परंपरा अखंडित ठेवल्याने नवीन प्रवेशासाठी विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, शिक्षकांनी सर्व इयत्तांचा अभ्यासक्रम पूर्ण करून घटक चाचणी व सहामाही परीक्षा यशस्वीरीत्या पार पाडल्या. या संकटाच्या काळात घेतलेल्या मेहनतीबद्दल विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना पत्र लिहून कृतज्ञता व्यक्त केली आहे.
शास्त्रीय पद्धतीने अद्ययावत शिक्षण हे ‘हिंदवी’चे बलस्थान..! लॉकडाऊननंतर शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षणासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले. स्कूलने मायक्रोसॉफ्ट टीमच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे 700 लायसन्स कॉपी काढण्यात आल्या आहेत. पालकांनी साथ दिल्याने तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आधुनिक शिक्षणाचे नवे पर्व सुरू झाले. 
‘हिंदवी’तील विषय शिक्षकांनी कल्पकतेने तयार केलेले शैक्षणिक व्हिडिओ, यू-ट्यूब, विकिपीडियाचा वापर करून पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनद्वारे विषय समजावून सांगितले. शिकवलेला विषय विद्यार्थ्यांना समजतोय का, हे ‘हिंदवी सायंटिफिक टेस्ट सिरीज’ व ऑनलाईन चाचण्या घेऊन त्यांच्या आकलनाची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर अत्यंत नियोजनबद्ध परीक्षेचा कार्यक्रम आखण्यात आला. या परीक्षेत पालकांनी महत्त्वाची भूमिका पार पडली. स्वयंअध्ययनाच्या जोरावर विद्यार्थ्यांनी पालकांच्या निरीक्षणाखाली परीक्षा दिली. विद्यार्थीही आनंदात परीक्षेला सामोरे गेल्यानंतर पालकांनी उत्तरपत्रिका शाळेत जमा केल्या. शिक्षकांनी त्या तपासून ऑनलाईन निकाल जाहीर केला. 
16 जूनपासून इयत्ता पाचवी ते नववी पर्यंतचे ऑनलाईन क्लासेसही शासकीय नियमांच्या चौकटीत राहून सुरू करण्यात आले आहे. तर पहिली ते चौथीमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून, त्यांना ऑफलाईन एज्युकेशन सुरू ठेवण्यासाठी शिक्षक निरंतर प्रयत्न करत आहेत. संकटाला सामोरे जात असताना ‘हिंदवी’चे ‘स्वयंमेव मृगेंद्रता’ हे बोधवाक्य सदैव प्रेरणा देत राहिले. त्यामुळे शिक्षक दिनाच्या मुहूर्तावर प्रवेश घेण्यासाठी पालक उत्सुक आहेत.


लॉकडाऊनमध्येही उपक्रमांची शृंखला 
महाराष्ट्र दिन 1 मे या दिवशी विद्यार्थ्यांनी विविध क्लृप्त्या लढवून प्रतिकात्मक झेंड्याची व्यवस्था केली. संपूर्ण परिवारासोबत ऑनलाईन राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत व देशभक्तिपर गीत सामूहिकपणे म्हटले. त्यामुळे घराघरांतील उत्सवाने सर्वांच्या मनात कोरोना विरोधात लढण्याची एक नवी स्फूर्ती निर्माण केली. याच पद्धतीने ‘हिंदवी’चा वर्धापन दिन 16 जूनला संपन्न झाला. सर्वांनी शाळेच्या पहिल्या दिवसाच्या स्मृती ऑनलाईन जागवल्या. दि. 21 जून, आंतरराष्ट्रीय योग दिनी सूर्यनमस्कार, विविध आसने ऑनलाईन सादर केली. घरात स्थानबद्ध असतानाही विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिन, शाळा वर्धापन दिन, आंतरराष्ट्रीय योग दिवस, स्वातंत्र्य दिन, गणेशोत्सव विविधतेने व कल्पकतेने उपक्रम राबवून साजरे केल्याचे हजारो फोटो व व्हिडिओ वर्ग शिक्षकांना पाठवले. त्यामुळे शाळेपासून शारीरिकदृष्ट्या दूर असलेली मुले मनाने शाळेतच असल्याचा अनुभव आला. त्यामुळे लॉकडाऊन ही ‘हिंदवी’च्या ज्ञानसाधनेसाठी पर्वणी ठरली.