education

esahas.com

नेपाळमध्ये आता Gen Z चा रॅपर पंतप्रधान, कर्नाटकात शिक्षण, ओलींना हटवलं, कोण आहेत बालेन शाह?

नेपाळच्या आंदोलकांनी संसद पेटवली असून केपी ओली शर्मा यांनी पंतप्रधानपदाचा राजीनाम दिला आहे. त्यामुळे नेपाळमध्ये आता सत्तांतर होणार असून नवीन नेतृत्व उदयास येणार आहे.

esahas.com

स्क्वॉड आला रे... इंग्रजीचा पहिला पेपर, शिक्षणमंत्र्यांनीच दिली 12 वीच्या परीक्षा केंद्रावर धडक; कॉपीमुक्त अभियान जोमात

राज्याचे शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म, गृह(ग्रामीण), गृहनिर्माण, राज्यमंत्री पंकज भोयर हे आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी परीक्षा केंद्रावर धाड टाकली.

esahas.com

भटके विमुक्त शिक्षण विकास संस्थेचे साताऱ्यात आंदोलन

राज्यातील १६५ शाहू, फुले, आंबेडकर निवासी आश्रमशाळा योजनेच्या शाळांचे थकीत वेतन व परिपोषण अनुदान तात्काळ मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्र भटके विमुक्त शिक्षण विकास संस्थेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे.

esahas.com

आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये सर्वात जास्त खर्च उच्च शिक्षणावर आणि अत्यंत कमी खर्च प्राथमिक शिक्षणावर होतो.हेच भारतीय शिक्षण पद्धतीचे सर्वात मोठे दुर्दैव आहे असे मत प्रा.नितीन बानुगडे पाटील यांनी व्यक्त केले.

रहिमतपूर, ता. कोरेगाव येथे भारतीय अभिरुप शिष्यवृत्ती राज्यस्तरीय परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ पार पडला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नितीन बानुगडे - पाटील बोलत होते. व्यासपीठावर खासदार श्रीनिवास पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, श्री गाडगेबाबा मिशन मुंबईचे चेअरमन मधुसूदन मोहिते पाटील, आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार माने पाटील, श्री चौंडेश्वरी एज्युकेशन सोसायटीचे सचिव अरुण माने, विद्यार्थी विकास फाउंडेशनच्या अध्यक्ष्या मनिषा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

esahas.com

शिक्षणातून काळाची आव्हाने पेलणारी पिढी निर्माण होते

सायळी हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय क्षीरसागर यांनी ज्ञानदानाचे पवित्र कार्य करताना असे अनेक माणिक मोती घडवण्याचे गौरवास्पद काम केल्याचे गौरवोद्गार प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी काढले.  

esahas.com

शैक्षणिक साहित्याची चोरी

अज्ञात चोरट्याने एका शाळेतून शैक्षणिक साहित्याची चोरी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

esahas.com

साताऱ्यात आदर्श शिक्षण संस्था स्पर्धेचे आयोजन

सातारा जिल्हा शिक्षण संस्था संचालक यांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यामध्ये आदर्श शिक्षण संस्था स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शिक्षण संस्थांच्या कामकाजाची माहिती घेऊन परीक्षण आणि निरीक्षणाद्वारे आदर्श शिक्षण संस्थेची निवड केली जाणार आहे.

esahas.com

शैक्षणिक निर्देशांकात राज्यात सातारा प्रथम क्रमांकावर; सिंधुदुर्ग-रत्नागिरी द्वितीय, तृतीय स्थानावर

राज्यात पहिल्या १० क्रमांकामध्ये सातारा सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक, सिंधुदुर्ग जिल्हा द्वितीय, तर रत्नागिरी जिल्ह्याने तृतीय क्रमांक मिळविला. बीड चौथा क्रमांक, मुंबई पाचवा, उस्मानाबाद सहा, पुणे सात, लातूर आठ, अहमदनगर नऊ, तर औरंगाबाद जिल्हा दहाव्या क्रमांकावर राहिला आहे.

esahas.com

सासकल येथे फलटण कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्यांनी साजरा केला 'राष्ट्रीय शिक्षण दिन'

मौजे सासकल येथे मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जन्मदिनानिमित्त महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संचलित फलटण एज्युकेशन सोसायटी चे फलटण कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी जय भवानी एज्युकेशन सोसायटी गिरवीचे शिवशंकर माध्यमिक विद्यालय सासकल येथे 'राष्ट्रीय शिक्षण दिन' साजरा करण्यात आला.

esahas.com

संयुक्त शिक्षक, शिक्षण बचाव समितीचे सातार्‍यात आंदोलन

सातारा नगरपरिषदेच्या शिक्षण मंडळ शाळा क्रमांक एकूण 18 पैकी पंधरा शाळांमध्ये नियुक्त शिक्षक, शिक्षण सहाय्यक व मदतनीस यांचे स्वतंत्र प्रस्ताव तयार करण्याची मागणी संयुक्त शिक्षण बचाव समितीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. या शिक्षक संघटनेच्या सदस्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली.

esahas.com

शासनाच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन शिक्षण विभाग प्रवेश प्रक्रिया राबवत आहे : शकुंतला काटकर

अनुदानित शाळांसाठी विवेकानंद अकॅडमी या शाळेकरीता नजीकच्या शाळेचे अंतर 1 किलोमीटर असल्याची बाब शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून देऊनही शिक्षण विभाग याकडे मुद्दाम दुर्लक्ष करीत आहे, असे श्री सारदादेवी चारिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती शकुंतला काटकर यांनी सांगितले.

esahas.com

अंध व्यक्तीच्या शिक्षणासाठी स्वयंसिद्ध कार्यशाळेची गरज

प्रत्येक व्यक्तीला जीवनात शिक्षणाची व्यवसाय प्रशिक्षणाची गरज आहे तितकीच स्वयंसिद्धा कार्यशाळेची सुद्धा आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक भावेश भाटिया यांनी केले.

esahas.com

प्राज्ञपाठशाळा मंडळाच्या विकासासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करुन दिला जाईल : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

प्राज्ञपाठशाळा मंडळाने तयार केलेले ग्रंथ व खंड हे राष्ट्रासाठी दिशादर्शक असून प्राज्ञपाठशाळेच्या विकासासाठी शासनाकडून निधी दिला जाईल अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

esahas.com

कराड पंचायत समितीचा शिक्षण महोत्सव संपन्न

कराड पंचायत समितीचा शिक्षण महोत्सव उत्साहात संपन्न झाला. दोन दिवसीय शिक्षण महोत्सवाची शुक्रवारी ११ रोजी सांगता झाली. महोत्सवानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचे निकाल व पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते पार पडले.

esahas.com

एसटी च्या संपामुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हाल

गेल्या दीडदोन वर्षांपासून कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा, महाविद्यालये ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये सुरू झाली.  प्रत्यक्ष वर्गात अध्ययन अध्यापन होत असल्याने विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षकवर्गही जोमाने कामाला लागला, दिवाळीच्या सुट्टी नंतर विद्यार्थ्यांच्या प्रथम सत्र परीक्षा ऑफलाइन घेण्याचे नियोजनही केलेले होते, मात्र एसटी बसेसच्या संपामुळे विद्यार्थ्यांना शाळेत तसेच महाविद्यालयात येणे शक्य नसल्याने पुन्हा एकदा विदयार्थ्यांना ऑनलाइनच परीक्षा द्याव्या लागत आहेत.

esahas.com

शिक्षण आणि आरोग्याची गुंतवणूक केली तरच राष्ट्र प्रगत बनते : आ. पृथ्वीराज चव्हाण

आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्थिती लक्षात घेऊन सर्व अधिकाऱ्यांनी प्रशासनात विकासाभिमुख भूमिका वठवावी. आपला देश जगाच्या पातळीवर आर्थिक, शैक्षणिक व आरोग्याच्या बाबतीत मागे आहे. आज जे देश प्रगत आहेत; ते शिक्षण आणि आरोग्य गुंतवणूक म्हणून करतात. म्हणून ती प्रगत राष्ट्रे आहेत. आपण शिक्षण व आरोग्य अनुत्पादन खर्च समजतो, त्यामुळे आपली प्रगती कमी असून शिक्षण आणि आरोग्याची गुंतवणूक केली; तरच राष्ट्र प्रगत बनते, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

esahas.com

पालिकेच्या शिक्षण मंडळाचे पुरस्कार खासदार उदयनराजेंच्या हस्ते प्रदान

सातारा पालिकेच्या शिक्षण मंडळाच्यावतीने देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात खासदार उदयनराजें भोसले यांच्या हस्ते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साधेपणाने कोणताही गाजावाजा न करता पार पडला.

esahas.com

राज्यातील महाविद्यालये 20 ऑक्टोबरपासून सुरु होणार : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग दि.20 ऑक्टोबर, 2021 पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केली.

esahas.com

मुलींची शाळा पाडल्याप्रकरणी  ब्राह्म समाजाच्या अध्यक्षांसह इतरांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

वाई येथील ब्राह्म समाजाच्या इमारतीत असलेल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची मुलींची शाळा पाडल्याप्रकरणी वाई न्यायालयाने वाई पोलिसांना ब्राह्म समाजाच्या अध्यक्षा मीनल राजेंद्र  साबळे त्यांचे पती राजेंद्र सर्जेराव साबळे व अन्य सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

esahas.com

शुल्क न भरल्याने एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, शिक्षणमंत्र्यांच्या शाळांना सक्त सूचना

मुंबई : शिक्षण शुल्कासंदर्भात शाळा, पालकांनी समन्वयानं निर्णय घेणेच योग्य आहे. शुल्क न भरल्याने एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, अशा शाळांना सक्त सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत. कोरोना काळातल्या शुल्काचा वाद टोकाला पोहोचला आहे. काल पुण्यात पालकांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना घेराव घातला होता. दरम्यान, वर्षा गायकवाड या पुणे दौऱ्य...

esahas.com

सौ. सरिता बलशेटवार यांना पीएचडी

प्रा. डॉ. सौ. सरिता बलशेटवार यांना नुकतीच, संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठाकडून पीएचडी प्रदान करण्यात आली. त्यांनी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शाखेतून, सेंटिमेंट अन्यालिसिस फॉर ऑर्गनायसिंग सोशल ऍक्टिव्हिटीस या विषयावर संशोधन करून विद्यापीठाला प्रबंध सादर केला.

esahas.com

‘सावरी’ गावातील मुलं डोंगरात शोधताहेत ‘रेंज’

जगात कोरोना महामारीनं थैमान घातल्यामुळं संसर्ग टाळण्यासाठी शासनानं ‘लॉकडाऊन’ जाहीर केलं. त्यामुळं गर्दीची ठिकाणं असलेली शाळा-महाविद्यालयं पूर्णतः ‘लॉक’ झाली. या काळात मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून शासनानं ‘ऑनलाईन शिक्षण’ सुरू केलं. पण हेच शिक्षण ‘सावरी’ या दुर्गम गावातील मुलांसाठी नेटवर्कअभावी गैरसोईचं ठरतंय. त्याच मुलांची ही खडतर कहाणी...

esahas.com

संचमान्यतेत शारीरिक शिक्षण शिक्षक परत आणणार

‘मागील अनेक वर्षांपासून बरीचशी शिक्षक पदे संचमान्यतेत नव्हती. अनेक शिक्षक संघटना, विषय संघटना यांच्या मागण्यांचा आघाडी सरकारने विचार करून संचमान्यतेत नसलेली शिक्षक पदे पुन्हा घेण्याबाबत संचमान्यतेच्या निकषात बदल करण्याचा निर्णय घेतला. संचमान्यतेच्या निकषात काही त्रुटी असतील तर त्या संदर्भात विचार करून सर्व समावेशक निर्णय लवकरच जाहीर करू. तसेच शारीरिक शिक्षण शिक्षक पदाबाबत संघटनेच्या मागणीचा शासन सकारात्मक विचार करेल,’ असे आश्‍वासन शालेय शिक्षणमंत्री वषार्र् गायकवाड यांनी दिले.

esahas.com

नातवाच्या शिक्षणासाठी धडपडणार्‍या दिव्यांग शिवाजी काशिदांचा सन्मान

कोरोना संकटाच्या  काळात पाल्याचे शिक्षण चांगल्या प्रकारे सुरु राहण्यासाठी शिक्षकांबरोबर पालकांची भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. काही पालक शिक्षकांच्या मदतीने पाल्याच्या शिक्षणासाठी प्रयत्नशील आहेत. असेच लोधवडे ता. माण जि. सातारा येथील एका गरीब कुटुंबातील दिव्यांग शिवाजी काशिद आजोबा नातवाच्या शिक्षणासाठी धडपडत आहेत.

esahas.com

पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला शिक्षण व रोजगारासाठी सवलती द्या 

‘मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने भाजपा सरकारप्रमाणेच या समाजाला शिक्षण व रोजगारासाठी आरक्षित घटकांप्रमाणे सवलती द्याव्यात,’ अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी केली.

esahas.com

नव्या शैक्षणिक धोरणामुळे भारतात संशोधन मोठ्या प्रमाणात होईल 

‘सध्याच्या शिक्षण पद्धतीत संस्थांची चलती आणि बाजारूपणा बोकाळला आहे. ज्ञानाच्या आधारावर नोकरी मिळवण्याची संकल्पना विद्यार्थ्यांच्या डोक्यातून पुसट होत आहे. नोकरी योग्य कौशल्य नसल्याने बेरोजगारी वाढत आहे. म्हणून नवीन शैक्षणिक धोरणात आता आंतरविद्याशाखीय पदवी घेण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे पुढील काळात रोजगार मिळण्यासाठी आंतरविद्याशाखीय पदवी आणि संशोधन काम हे उपयोगी ठरेल.

esahas.com

कोरोनावर मात करणारा ‘हिंदवी’चा अभिनव शिक्षण प्रयोग

सध्या कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदवी पब्लिक स्कूलची ‘ऑनलाईन’ डिजिटल शाळा सुरू आहे. शिक्षकांनी हातात हात घालून दर्जेदार शिक्षणाची परंपरा अखंडित ठेवल्याने नवीन प्रवेशासाठी विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

esahas.com

चालू शैक्षणिक वर्षात ३० टक्के शैक्षणिक शुल्क माफ करा

चालू शैक्षणिक वर्षामध्ये शैक्षणिक शुल्कामध्ये ३० टक्के कपात करण्यात यावी. यासह विविध मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी भाजपा नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. यावेळी भाजपचे जिल्हाध्य