वाढती बाल गुन्हेगारी चिंतेचा विषय असून त्यांना कायद्याचे अभय मिळत आहे. बाल गुन्हेगारांवरही खटले चालवण्यासाठी पोलीस अधिक प्रयत्नशील राहतील, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी येथे दिली.
केंद्र शासनाने घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात केलेल्या वाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आज सातारा येथील भाजी मंडईत चुलीवर भाकरी भाजून, केंद्र शासनाच्या विरोधात घोषणा देत निषेध केला.
एकंदरीतच मिस्टर रामराजेंसारखा गद्दार आणि लाचार पंटर फलटण तालुक्याला मिळाला होता, अशी घणाघाती टीका खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी मिस्टर रामराजेंवर नाव न घेता केली आहे.
अपघातात एका महिलेस जखमी केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
एकावर कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शेळ्यांच्या मृत्यूप्रकरणी तिघांवर वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
राधिका रस्त्यावर असणाऱ्या एका दुकानासमोरुन दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी तिघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कराड शहर परिसरात गुन्हेगारी कृत्ये करणारा धोकादायक असलेला गुन्हेगार अभिनंदन रतन झेंडे (वय 35, रा. शनिवार पेठ, कराड) याच्यावर स्थानबध्दतेची (एमपीडीए) कारवाई करण्यात आली. कराडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी कलेक्टर व पोलिस अधीक्षक यांनी दणका दिल्याने गुन्हेगारी जग हादरले आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांची जाहीर सभा 3 मार्च रोजी येथील शाहू कला मंदिर मध्ये होणार आहे. शिवसेनेच्या शिवगर्जना अभियानांतर्गत त्यांच्या उपस्थितीत येथे शिव निर्धार मेळावा होणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी दिली आहे.