खासदार संजय राऊत यांची तोफ साताऱ्यात धडाडणार
शाहू कला मंदिर येथे 3 मार्च रोजी ठाकरे गटाचा शिव निर्धार मेळावा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांची जाहीर सभा 3 मार्च रोजी येथील शाहू कला मंदिर मध्ये होणार आहे. शिवसेनेच्या शिवगर्जना अभियानांतर्गत त्यांच्या उपस्थितीत येथे शिव निर्धार मेळावा होणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी दिली आहे.
सातारा : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांची जाहीर सभा 3 मार्च रोजी येथील शाहू कला मंदिर मध्ये होणार आहे. शिवसेनेच्या शिवगर्जना अभियानांतर्गत त्यांच्या उपस्थितीत येथे शिव निर्धार मेळावा होणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी दिली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून शिवगर्जना अभियानाला सुरुवात होणार आहे. शुक्रवारी ही शिवगर्जना सातारा जिल्ह्यात घुमणार आहे. त्या अंतर्गत सातारा येथील शाहू कला मंदिरात सायंकाळी पाच वाजता शिवनिर्धार मेळावा होत असून त्यात खासदार संजय राऊत मार्गदर्शन करणार आहेत. खासदार प्रियंका चतुर्वेदी, प्रवक्ते लक्ष्मण हाके, माजी आमदार बाबुराव माने, युवा सेनेचे विक्रांत जाधव यांची यावेळी उपस्थिती असणार आहे.
शिवगर्जना अभियानाच्या नियोजना संदर्भात बुधवारी कराड येथे शासकीय विश्रामगृहात सकाळी अकरा वाजता व सातारा विश्रामगृहात दुपारी दोन वाजता, तर दहिवडी शासकीय विश्रामगृह सायंकाळी पाच वाजता बैठकांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, हर्षद कदम आणि संजय भोसले यांनी दिली आहे.