कराड शहर परिसरात गुन्हेगारी कृत्ये करणारा धोकादायक असलेला गुन्हेगार अभिनंदन रतन झेंडे (वय 35, रा. शनिवार पेठ, कराड) याच्यावर स्थानबध्दतेची (एमपीडीए) कारवाई करण्यात आली. कराडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी कलेक्टर व पोलिस अधीक्षक यांनी दणका दिल्याने गुन्हेगारी जग हादरले आहे.
सातारा : कराड शहर परिसरात गुन्हेगारी कृत्ये करणारा धोकादायक असलेला गुन्हेगार अभिनंदन रतन झेंडे (वय 35, रा. शनिवार पेठ, कराड) याच्यावर स्थानबध्दतेची (एमपीडीए) कारवाई करण्यात आली. कराडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी कलेक्टर व पोलिस अधीक्षक यांनी दणका दिल्याने गुन्हेगारी जग हादरले आहे.
अभिनंदन झेंडे याच्याविरुध्द पोलिस ठाण्यामध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याने साथीदारांच्या मदतीने खूनाचा प्रयत्न करणे, साधी व गंभीर दुखापत, शिवीगाळ दमदाटी करणे, सार्वजनिक शांततेचा भंग करणे, बेकायदेशीर हत्यार बाळगणे, सरकारी नोकरास मारहाण करणे, खंडणी मागणे, चोरी, जबरी चोरी, हद्दपार आदेशाचे उल्लंघन करणे असे गुन्हे केले आहेत. वेळोवेळी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतरही त्यामध्ये सुधारणा होत नव्हती.
कराड शहर पोनि बी.आर.पाटील यांनी अभिनंदन झेंडे याच्या स्थानबध्दतेचा प्रस्ताव तयार करुन तो पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे पाठवण्यात आला. सातार्यामध्ये या प्रस्तावाची पडताळणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केल्यानंतर तो एसपींच्या मार्फतीने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याकडे पाठवण्यात आला असता त्यांनीही मंजुरी दिली. अभिनंदन झेंडेवर सातारा पोलिसांनी कारवाई केल्याचे समोर आल्यानंतर कराडमध्ये चर्चा रंगली.
ही कारवाई करण्यासाठी कराडचे डीवायएसपी रणजित पाटील, पोनि भगवान निंबाळकर, सपोनि अमित बाबर, पोलिस नितीन येवळे, विनोद माने, प्रफुल्ल गाडे यांनी विशेष परिश्रम घेतले. दरम्यान, एसपी समीर शेख यांनी जिल्ह्याच्या कार्यभार घेतल्यापासून 4 मोक्का अंतर्गत 44, 9 जणांना तडीपार करण्यात आले असून अजूनही अनेक प्रस्ताव दाखल होत असून कारवाई सुरुच राहणार आहेत.


