एकावर कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : एकावर कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास अरविंद किराणा स्टोअर्स समोर प्रतापसिंह नगर सातारा येथील रस्त्यावर दारू पिण्यासाठी पैसे मागितल्याच्या कारणावरून रोहित भोसले राहणार प्रतापसिंह नगर सातारा याने कुऱ्हाडीने तेथीलच मारुती दत्ता जाधव यांच्या पाठीत वार करून आणि जाधव यांच्या मेव्हण्याला शिवीगाळ करून दमदाटी केली. याप्रकरणी भोसले याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक दळवी करीत आहेत.