maharashtra

शेळ्यांच्या मृत्यूप्रकरणी तिघांवर गुन्हा


शेळ्यांच्या मृत्यूप्रकरणी तिघांवर वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : शेळ्यांच्या मृत्यूप्रकरणी तिघांवर वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 24 फेब्रुवारी रोजी पावणेदहा वाजण्याच्यापूर्वी राजेंद्र संभाजी जाधव, मनोज संभाजी जाधव, महेश मोरे (पूर्ण नाव माहित नाही) सर्व रा. वाघोली, ता. कोरेगाव यांनी तेथीलच संतोष अंकुशराव भोईटे यांच्या 24 हजार रुपये किंमतीच्या तीन शेळ्यांना काहीतरी विषारी औषध खायला घालून त्यांना मारून भोईटे यांचे नुकसान केले. याप्रकरणी वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार केंजळे करीत आहेत.