राधिका रस्त्यावर असणाऱ्या एका दुकानासमोरुन दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सातारा : राधिका रस्त्यावर असणाऱ्या एका दुकानासमोरुन दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 फेब्रुवारी रोजी रात्री पावणे आठ ते सव्वा आठ वाजण्याच्या दरम्यान राजाराम महादेव पाटील रा. करंजे पेठ, सातारा यांची हिरो कंपनीची दुचाकी क्रमांक एमएच 11 बीटी 1187 ही सिद्धिविनायक हॉस्पिटल साताराच्या शेजारी असणाऱ्या रोडच्या कडेला पार्क केली होती. ती अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याबाबतची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून अधिक तपास महिला पोलीस हवालदार भोसले करीत आहेत.


