maharashtra

अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा


अपघातात एका महिलेस जखमी केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : अपघातात एका महिलेस जखमी केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथे करुणा महादेवराव दुधे रा. तामजाई नगर, सातारा यांच्या दुचाकीस एका बुलेटवरील चालकाने (बुलेट क्रमांक एमएच 11 सीआर 2332) धडक देऊन दुधे यांना जखमी केले आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार कारळे करीत आहेत.