सातारा शहरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हयाची अर्थवाहिनी व सर्व सामान्यांची बँक असा नावलौकिक प्राप्त असलेल्या जनता सहकारी बँक लि., साताराचा ६० वा म्हणजेच हिरक महोत्सवी वर्धापनदिन ७ मार्च रोजी आनंद आणि उत्साहाचे वातावरणात झाला.
भुईंज फिडर, वाठार फिडर व कोरेगाव तालुक्यातील इतर फिडर ची विद्युत सेवा फेब्रुवारी महिन्यापासून दोन ते तीन तास मिळत आहे. या गोष्टीच्या निषेधार्थ राज्य इरिगेशन फेडरेशन यांच्यावतीने महाराष्ट्र वीज वितरणच्या कृष्णा नगर येथील कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्र व प्रख्यात अभिनेते पर्यावरण प्रेमी सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला झाला आहे. ही घटना तासवडे परिसरात मंगळवारी सकाळी घडली.
जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी आजपासून सरकारी कर्मचारी संपावर असून विविध शासकीय विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
धमक्यांना कंटाळून गळफास घेतलेल्या शेतकरी युवक नवनाथ मारुती दडसच्या आत्महत्येप्रकरणी म्हसवड आणि फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोघी कॉन्स्टेबल बहिणींसह त्याच्या आई- वडिलांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी अज्ञातावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बगाड यात्रेत महिलेच्या पर्सची चोरी केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा शहरात राहणारा एक युवक बेपत्ता झाला असल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.