बगाड यात्रेत महिलेच्या पर्सची चोरी केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : बगाड यात्रेत महिलेच्या पर्सची चोरी केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 12 मार्च रोजी दुपारी 4 च्या दरम्यान वाई ते पाचवड जाणाऱ्या रस्त्यावर बगाड यात्रेत सौ. सत्वशीला हनुमंत पवार रा. देगाव फाटा, सातारा यांच्या काखेत अडकवायच्या पर्सची चेन खोलून त्या पर्समध्ये ठेवलेली हातातील कापडी पर्स ज्यामध्ये अकराशे रुपये रोख आणि पंधरा हजार रुपये किमतीचा ओपो कंपनीचा मोबाईल होता, ती पर्स अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याबाबतची नोंद वाई पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.


