एकास मारहाण केल्याप्रकरणी अज्ञातावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी अज्ञातावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 11 मार्च रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अशोक भिकाजी सोनवणे राहणार स्वरांजली विला, भैरोबाच्या पायथ्याजवळ, सातारा यांच्या डोक्यात अज्ञाताने काही कारण नसताना अचानक पाठीमागून डोक्यात वीट मारली. यानंतर संबंधित पळून गेला आहे. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार कदम करीत आहेत.


