maharashtra

सातारा शहरातून दुचाकीची चोरी


सातारा शहरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

सातारा : सातारा शहरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 12 मार्च रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास धुमाळ आळी, मंगळवार पेठ, सातारा येथून निलेश दिलीप शिर्के यांची घरासमोर पार्क केलेली वीस हजार रुपये किंमतीची, सुझुकी कंपनीची मोपेड मोटरसायकल क्र. एमएच 11 सीडी 1056 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याबाबतची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार जगदाळे करीत आहेत.