युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, डिसेंबर 2022 ते 13 मार्च 2023 दरम्यान सातारा शहर परिसरात राहणाऱ्या एका युवतीचा पाठलाग करून तसेच तिला धमकी देऊन आणि तिच्या मोटरसायकलची स्पीडोमीटर व नंबर प्लेट फोडल्याप्रकरणी यश प्रभाकर गुजर रा. संभाजीनगर, सातारा याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मोटे करीत आहेत.


