सातारा शहरात राहणारा एक युवक बेपत्ता झाला असल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सातारा : सातारा शहरात राहणारा एक युवक बेपत्ता झाला असल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 मार्च रोजी रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान जय दिनकर गुरव वय 25, रा. शिव आदित्य अपार्टमेंट, मंगळवार पेठ, सातारा हा बॉडी बिल्डिंग स्पर्धा पाहण्यासाठी जातो, असे सांगून घरातून निघून गेला. तो बेपत्ता असल्याबाबतची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून अधिक तपास महिला पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.


