येथील जिल्हा परिषद मैदानावर दि. १४ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या सत्संग कार्यक्रमातून अज्ञात चोरट्यांनी ५ लाख ९१ हजार ५०० रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याच्या तक्रारी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्रामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ओबीसींची जातनिहाय जनगणना कार्यात घ्यावी, यासह विविध मागण्यांसाठी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागातर्फे जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.
राज्य शासनाने महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत देणारी महिला सन्मान योजना शुक्रवारी रात्री बारा वाजल्यापासून लागू केली. या योजनेचे सातारा जिल्ह्यातील महिला प्रवाशांनी जोरदार स्वागत करत पहिल्या दिवशी प्रवासाचा लाभ घेतला.
राज्य सरकारी कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी सध्या राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. त्यांच्या या संपास आम आदमी पार्टीच्या वतीने पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार (सागर) भोगांवकर, जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव यांनी जाहीर पाठिंबा दिल्याचे जाहीर केले आहे.
प्रेम प्रकरणातून एक वर्षापूर्वी अल्पवयीन मुली बरोबर बालविवाह होऊन त्या अल्पवयीन मुलीची प्रसूती सातारा येथील जिल्हा रुग्णालयात झाली असून तिच्या पतीवर पोक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपाच्या तिसऱ्या दिवशी पोवाडे, कविता आणि व्याख्यानांनी राज्य शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला. संपामध्ये 6 हजार 9994 कर्मचारी सहभागी झाले आहेत.
मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 2091 वाहनांवर कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडून 12 लाख 66 हजार 750 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे, अशी माहिती साताऱ्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
संपूर्ण राज्यभरात बिफ हब म्हणून ओळखल्या जाणार्या फलटण तालुक्यामध्ये गेल्या अनेक दशकांपासून राजरोसपणे गोवंशाची कत्तल केली जात होती. महानुभाव पंथाची काशी समजल्या जाणार्या फलटणला याच बिफ माफियांनी आता जेरीस आणले आहे.
सातार्यात सत्संग सुरु असताना महिलांच्या दागिन्यांवर डल्ला मारणार्या महिलांना सातारा शहर पोलिसांनी अटक केली. सर्व महिला बाहेरील जिल्ह्यातील असून पोलिस त्यांच्याकडे कसून चौकशी करत आहेत.
पाचगणी - वाई या मार्गावर शेरबाग जवळ एसटी बस आणि डंपरची समोरासमोर धडक होवून झालेल्या भीषण अपघातात ५ जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे.